शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

एक हजाराची लाच घेताना आष्ट्यातील नायब तहसीलदार, लिपिक एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 17:24 IST

सातबारा उताऱ्यावर नावात बदल करण्यासाठी केली लाचेची मागणी

आष्टा : सातबारा उताऱ्यावर नावात बदल करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना आष्टा येथील अतिरिक्त तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार व लिपिकास रंगेहात पकडले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.नायब तहसीलदार बाजीराव राजाराम पाटील (वय ५२ रा. अशोकराज निवास, ता शिराळा, जि. सांगली) व लिपिक सुधीर दीपक तमायचे (३७ रा. शांतीनगर, इचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी या दोघांची नावे आहेत. एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोटखिंडी ता. वाळवा येथील एका शेतकऱ्याने सातबारा उताऱ्यावर नावात बदल करून मिळण्याबाबत अप्पर तहसीलदार कार्यालय आष्टा यांच्याकडे अर्ज केला होता. नावामध्ये बदल करून देण्याच्या कामांमध्ये प्रकरण सही करून तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यासाठी नायब तहसीलदार बाजीराव पाटील व लिपिक सुधीर तमायचे यांनी संबंधित शेतकऱ्याकडे एक हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.याबाबत संबंधित शेतकऱ्याने सांगली लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. दरम्यान आज, सकाळच्या दरम्यान संबंधित शेतकरी व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी नायब तहसीलदार बाजीराव पाटील व लिपिक सुधीर तमायचे याच्याकडे गेले असता त्यांनी एक हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम स्विकारताना या दोघांना रंगेहात अटक करण्यात आली.या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुण्याचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस उपायुक्त सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे, अंमलदार अविनाश सागर, संजय संकपाळ, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, सीमा माने, संजय कलगुटगी, भास्कर भोरे, सलीम मकानदार, रवींद्र धुमाळ, राधिका माने व बाळासाहेब पवार यांनी कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी