सांगली बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात उपनिबंधकांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:08+5:302021-04-01T04:27:08+5:30
सांगली : सांगली बाजार समिती संचालक मंडळाची मुदत दि. २६ फेब्रुवारीस संपली आहे. त्यानंतर प्रशासक नेमण्यात जिल्हा उपनिबंधकांनी दुर्लक्ष ...

सांगली बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात उपनिबंधकांचे दुर्लक्ष
सांगली : सांगली बाजार समिती संचालक मंडळाची मुदत दि. २६ फेब्रुवारीस संपली आहे. त्यानंतर प्रशासक नेमण्यात जिल्हा उपनिबंधकांनी दुर्लक्ष केले आहे. संचालक मंडळाविनाच दोन महिन्यापासून कारभार सुरु आहे, असा आरोप शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी बुधवारी केला. जिल्हा उपनिबंधकांविरोधात शासनाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, एखाद्या सहकारी संस्थेची मुदत संपल्यानंतर तेथे तत्काळ प्रशासक नेमण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांना आहेत. सांगली बाजार समितीच्या संचालकांची वाढीव मुदत दि. २६ फेब्रुवारीस संपली आहे. ल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी दि. २७ फेब्रुवारीपासून प्रशासक नेमण्याची गरज होती. मात्र त्याबाबतीत हयगय केली आहे. याबाबत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोहन परमणे, शंकर कापसे, सचिन गवळी, एकनाथ कापसे यांनी बुधवारी करे यांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली आहे. प्रशासक आताच नेमावेत, तोपर्यंत येथून उठणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेऊन कार्यालयात ठिय्या मारला होता. दरम्यान, करे यांनी याबाबत कोणती कारवाई केली, याची उद्या माहिती देतो, असे सांगितले. दोन दिवसात प्रशासक न नेमल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
चौकट
मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे : निळकंठ करे
बाजार समिती संचालकांची मुदत संपली आहे. पण, मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाकडे असल्यामुळे प्रशासक नेमला नाही. येत्या दोन दिवसात शासनाकडून अभिप्राय घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी दिली.