इस्लामपुरातील घरकुलांसाठी उपनगराध्यक्षांचा आंदोलनाचा इशारा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:53+5:302020-12-05T05:06:53+5:30

इस्लामपूर : शहरामध्ये इस्लामपूर नगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूूर लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते त्वरित मिळावेत, तसेच ९५४ ...

Deputy mayor's agitation warning for houses in Islampur; | इस्लामपुरातील घरकुलांसाठी उपनगराध्यक्षांचा आंदोलनाचा इशारा;

इस्लामपुरातील घरकुलांसाठी उपनगराध्यक्षांचा आंदोलनाचा इशारा;

इस्लामपूर : शहरामध्ये इस्लामपूर नगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूूर लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते त्वरित मिळावेत, तसेच ९५४ घरकुलांसाठीचा १५२ कोटी ९६ लाखांचा निधी उपलब्ध न झाल्यास १० डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन पाटील यांनी उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांना दिले आहे. यामध्ये २०१७ पासून शहरातील घरकुल नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार ९५४ लाभार्थ्यांचे ४ डीपीआर मंजूर करून घेतले आहेत. तसेच ३८८ लाभार्थ्यांचा पाचवा प्रस्तावित डीपीआर मंजुरीसाठी म्हाडा कार्यालयाकडे मार्च १९२० मध्ये पाठविण्यात आला आहे. त्याची मंजुरी प्रलंबित असून ती लवकरात लवकर मिळावी, शहरातील निधीअभावी रखडलेली घरकुलांची कामे वेळेत पूर्ण होऊन लाभार्थ्यास हक्काचे घर मिळण्यासाठी अप्राप्त असलेला १५२ कोटी ९६ लाखांचा निधी त्वरित मिळावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

०३१२२०२०-आयएसएलएम- नगरपालिका न्यूज :

इस्लामपूूर येथे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांना निवेदन दिले.

Web Title: Deputy mayor's agitation warning for houses in Islampur;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.