उपायुक्त स्मृती पाटील कार्यमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:19 IST2021-07-10T04:19:22+5:302021-07-10T04:19:22+5:30

सांगली : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाकडील उपायुक्त स्मृती पाटील यांना शुक्रवारी आयुक्त नितीन कापडणीस यांनी कार्यमुक्त केले. त्यांच्या बदलीचे ...

Deputy Commissioner Smriti Patil dismissed | उपायुक्त स्मृती पाटील कार्यमुक्त

उपायुक्त स्मृती पाटील कार्यमुक्त

सांगली : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाकडील उपायुक्त स्मृती पाटील यांना शुक्रवारी आयुक्त नितीन कापडणीस यांनी कार्यमुक्त केले. त्यांच्या बदलीचे ठिकाण अद्याप अनिश्चित आहे. आता शासनाकडूनच त्यांच्या नव्या नियुक्तीबाबत निर्णय होईल.

उपायुक्त पाटील या गेली साडेचार वर्षे महापालिकेत कार्यरत आहेत. आधी त्यांची सहायक आयुक्तपदावर शासनाने प्रतिनियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांची उपायुक्तपदी नियुक्ती केली. त्या सहकार विभागात निबंधक पदावर होत्या. त्यांचा कार्यकाल ३१ मे महिन्यात पूर्ण झाला होता; मात्र शासनाने कोरोनामुळे बदली प्रक्रियेला ३० जूनपर्यंत स्थगिती दिली होती. आता जुलै महिन्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू केले आहे. त्यांची बदली अपेक्षित होती. त्यांना शासनाकडून नव्या नियुक्तीचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. तत्पूर्वीच त्यांना महापालिकेच्या उपायुक्तपदावरून कार्यमुक्त करण्यात आले. महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक काळ उपायुक्तपदावर राहण्याचा मानही पाटील यांना मिळाला.

Web Title: Deputy Commissioner Smriti Patil dismissed