दिव्यांग उदरनिर्वाह भत्त्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:26 IST2021-05-13T04:26:40+5:302021-05-13T04:26:40+5:30

सांगली : महापालिका क्षेत्रातील दिव्यांग लोकांना त्यांच्या मासिक उदरनिर्वाह भत्त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावरील हा अन्याय दूर करुन ...

Deprived of Divyang subsistence allowance | दिव्यांग उदरनिर्वाह भत्त्यापासून वंचित

दिव्यांग उदरनिर्वाह भत्त्यापासून वंचित

सांगली : महापालिका क्षेत्रातील दिव्यांग लोकांना त्यांच्या मासिक उदरनिर्वाह भत्त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावरील हा अन्याय दूर करुन तातडीने भत्ता द्यावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संभाजी सावंत यांनी केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आयुक्त नितीन कापडणीस व दिव्यांग विभागप्रमुख तथा उपायुक्त स्मृती पाटील यांच्यामार्फत दिव्यांगाना २०२०-२१ या आर्थिक वर्षात मासिक उदरनिर्वाह भत्ता दिलेला नाही. त्यामुळे दिव्यांगांवर हा एकप्रकारचा अत्याचार आहे. प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शासनाने दिलेल्या उदरनिर्वाह भत्त्याचे वितरण करण्यात कसूर करण्यात येत आहे.

माहिती अधिकारातून या बाबी समोर आल्या आहेत. दिव्यांग मासिक उदरनिर्वाह भत्ता तत्काळ अदा करावा, सध्या कोरोना महामारी सुरु आहे. त्यामुळे दिव्यांगाना मुळातच घरातून बाहेर पडता येत नाही आणि दुष्काळात धोंडा म्हटल्याप्रमाणे महापालिकेने त्यांना मासिक उदरनिर्वाह भत्ता वर्षभर दिलेला नाही. बाकीची सर्व बिले अदा करत असताना दिव्यांगांचा मासिक उदरनिर्वाह का अडवला आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे तातडीने दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा भत्ता देण्यात यावा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

Web Title: Deprived of Divyang subsistence allowance