बफरझोनमधील नागरिक अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:30 IST2021-09-04T04:30:56+5:302021-09-04T04:30:56+5:30
सांगली : २०१९ च्या महापुरात पडझड झालेल्या ब्लू व बफर झोनमधील १८ घरांची पडझड झाली होती. पण त्यांना अद्याप ...

बफरझोनमधील नागरिक अनुदानापासून वंचित
सांगली : २०१९ च्या महापुरात पडझड झालेल्या ब्लू व बफर झोनमधील १८ घरांची पडझड झाली होती. पण त्यांना अद्याप शासकीय अनुदान मिळालेले नाही. शासनाकडे वारंवार हेलपाटे मारूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवकचे शहर अध्यक्ष विशाल हिप्परकर यांनी केला.
हिप्परकर म्हणाले की, २०१९ च्या महापुरात कर्नाळ रस्ता, मगरमच्छ काॅलनी, सांगलीवाडी परिसरातील ५६ घरे पूर्णत: उद्धवस्त झाली. त्यांना अनुदान देण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना, जिल्हाधिकाऱ्यांनी ब्लू व बफर झोनमधील घरांना अनुदानातून वगळण्याची सूचना केली. त्यामुळे १८ पूरग्रस्त नागरिकांचे अनुदान जमा झाले नाही. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी वस्तूस्थिती तपासून अनुदान देण्याची सूचना केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांनाही उचित कार्यवाही करण्याचे पत्र दिले. आयुक्तांनी १८ घरांसाठी १७ लाख ११ हजाराचे अनुदान महापालिकेकडे वर्ग करण्याची विनंती केल;पण आजअखेर अनुदान प्राप्त झालेले नाही.
याबाबत तहसीलदार, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी अनुदान देता येत नसल्याचे सांगितले. अनुदान नाकारणाऱ्या प्रशासनाविरोधात आंदोलन छेडणार असून, प्रसंगी न्यायालयातही दाद मागणार असल्याचे हिप्परकर यांनी सांगितले.