वंचित बहुजन आघाडीचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:47+5:302021-08-15T04:27:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मिरजेतील अन्न व नागरी पुरवठा विभागातील बेशिस्त, निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत ...

वंचित बहुजन आघाडीचे उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरजेतील अन्न व नागरी पुरवठा विभागातील बेशिस्त, निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी शनिवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
आघाडीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अन्न पुरवठा विभागात तीन वर्ष झाले गोरगरीब, कष्टकरी, श्रमिक जनतेचे रेशन धान्य मिळण्याबाबत अर्ज प्रलंबित आहेत. त्यावर त्यांना अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. विचारणा केली असता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून बेशिस्त वर्तणूक, अशोभनीय भाषा वापरली जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.
संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू असल्याचे लेखी प्रत प्रशासनातर्फे देण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या विनंतीनंतर आंदोलकांनी आमरण उपोषण स्थगित केले व कारवाई न झाल्यास पुन्हा आठ दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पीडित कष्टकरी श्रमिक नागरिकांना घेऊन आमरण उपोषण सुरू करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, उमरफारूक ककमरी, संजय कांबळे, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, परशुराम कांबळे, सचिन कोलप, हिरामण भगत, आनंदा गाडे, सिद्धार्थ कोलप, मानतेश कांबळे, संतोष कदम आदी सहभागी होते.