पलुस तालुका राष्ट्रवादी युवतीतर्फे महिलांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:27 IST2021-03-16T04:27:03+5:302021-03-16T04:27:03+5:30

कुंडल : समाजातील गुणवंत महिलांचा सत्कार करून पलुस तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. ...

Deprivation of women by Palus taluka NCP youth | पलुस तालुका राष्ट्रवादी युवतीतर्फे महिलांचा गाैरव

पलुस तालुका राष्ट्रवादी युवतीतर्फे महिलांचा गाैरव

कुंडल : समाजातील गुणवंत महिलांचा सत्कार करून पलुस तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. आमदार अरूण लाड व शरद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पलुस तालुक्यातील गुणवंत महिलांचा सन्मान तालुका महिलाध्यक्ष नंदा पाटील, युवती अध्यक्षा प्राजक्ता जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी तालुक्यातील दौंडच्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली कोरे, उद्योजिका दिपाली पवार, वर्षाराणी राडे, भरतनाट्यम गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद झालेल्या वसुंधरा निकम, हॉलीबॉल सुवर्णपदक विजेत्या गायत्री मोहिते, नीलम साळुंखे, उपमहाराष्ट्र केसरी स्वाती पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू अंजली पवार, मानवाधिकारी संरक्षण संघटना कार्याध्यक्ष शुभांगी काशीद, अपंग साहाय्य दूत मीरा जाधव, ऐश्र्वर्या राडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंगल शितापे, सारीका पाटील, सुनंदा पाटील, पूजा पवार, अश्विनी संकपाळ, वैष्णवी जंगम आदी उपस्थित होत्या.

Web Title: Deprivation of women by Palus taluka NCP youth