मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ येथील सहा जणांच्या हद्दपारीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST2021-02-10T04:26:58+5:302021-02-10T04:26:58+5:30

हद्दपार करण्यात आलेल्यांत शाैकत महेबूब शेख (रा. खाॅजा वसाहत, मिरज), प्रमोद रामचंद्र उगारे (रा. सावळज, ता. तासगाव), ...

Deportation order of six persons from Miraj, Tasgaon and Kavthemahankal | मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ येथील सहा जणांच्या हद्दपारीचे आदेश

मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ येथील सहा जणांच्या हद्दपारीचे आदेश

हद्दपार करण्यात आलेल्यांत शाैकत महेबूब शेख (रा. खाॅजा वसाहत, मिरज), प्रमोद रामचंद्र उगारे (रा. सावळज, ता. तासगाव), शकील जलील शेख (रा. रेवणी गल्ली. मिरज), प्रशांत महादेव हारगे (रा. सलगरे, ता. मिरज) या चाैघांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. अल्विन संजय वाघमारे (रा. कवठेमहांकाळ) व योगेश ऊर्फ भास्कर भारत झुरे (रा. ढालगाव, ता. कवठेमहांकाळ) या दोघांना सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. गुन्हेगाी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी या सहाजणांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव प्रातांधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, चोरी, जबरी चोरी, बलात्कार, बाललैंगिक अत्याचार, अपहरण असे एकापेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याने प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दपारीचे आदेश दिले आहेत.

Web Title: Deportation order of six persons from Miraj, Tasgaon and Kavthemahankal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.