सनमडीकर यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान : विश्वजित कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:31+5:302021-07-14T04:31:31+5:30
माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे नुकतेच निधन झाले. डॉ. कदम यांनी जत येथे सनमडीकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. ...

सनमडीकर यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान : विश्वजित कदम
माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे नुकतेच निधन झाले. डॉ. कदम यांनी जत येथे सनमडीकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. ते म्हणाले की, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांनी जत तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी माेठे प्रयत्न केले. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. कदम घराण्याबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी डॉ. कैलास सनमडीकर, डॉ. वैशाली सनमडीकर, विजय सनमडीकर, आमदार विक्रम सावंत, माजी सभापती बाबासाहेब कोडग, जत शहर काँग्रेसचे अध्यक्ष भूपेंद्र कांबळे, रामपूरचे माजी सरपंच मारुती पवार, विक्रम फाउंडेशनचे ॲड. युवराज निकम, नाना शिंदे, गणेश गिड्डे, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, काका शिंदे उपस्थित होते.
130721\img-20210713-wa0031.jpg
सनमडीकर यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान : ना.विश्वजित कदम