पुण्यात हल्लाप्रकरणी सांगलीमध्ये निदर्शने
By Admin | Updated: September 4, 2014 00:02 IST2014-09-03T23:55:39+5:302014-09-04T00:02:09+5:30
हल्याप्रकरणी संबंधितांना अटक करुन कारवाई करावी

पुण्यात हल्लाप्रकरणी सांगलीमध्ये निदर्शने
सांगली : पुणे येथील मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष व सीआयटीयू कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ आज (बुधवार) मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हा सचिव उमेश देशमुख यांनी केले. पुणे येथील माकपच्या कार्यालयावर भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या कार्यकर्त्यानी २ सप्टेंबररोजी हल्ला करून नासधूस केली. या हल्ल्यास जबाबदार असणाऱ्यांना अद्याप अटक झालेली नाही. जातीय शक्तींचा उन्माद आज देशाला भोगावा लागत आहे. असे असले तरी माकप विचारांची लढाई विचारानेच लढणार आहे. या हल्याप्रकरणी संबंधितांना अटक करुन कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. आंदोलनामध्ये रेहाना शेख, बेबीजोहरा नदाफ, लतीफा पेटकर, आयेशा नदाफ, खैरुन मुजावर, दिलीप कांबळे, शरीफा सुतार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)