तासगावात मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST2021-06-29T04:18:46+5:302021-06-29T04:18:46+5:30
ब्रिटिशंच्या १९३१च्या जनगणनेनुसार ओबीसींची लोकसंख्या ५४ टक्के ग्राह्य धरताना मराठा समाजाला समाविष्ट केले होते, परंतु ओबीसींसोबत आरक्षण मिळाले नाही. ...

तासगावात मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने
ब्रिटिशंच्या १९३१च्या जनगणनेनुसार ओबीसींची लोकसंख्या ५४ टक्के ग्राह्य धरताना मराठा समाजाला समाविष्ट केले होते, परंतु ओबीसींसोबत आरक्षण मिळाले नाही. त्याला राज्यकर्तेच कारणीभूत आहेत. आताही समाजाला झुलवत ठेवले आहे. आता संभाजी ब्रिगेड गप्प बसणार नाही. मोठा लढा उभा करणार आहे. सर्व समाजघटकांची जनगणना झाली पाहिजे. सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पंचवीस हजार कोटी त्वरित दिले पाहिजेत. पावसाळी अधिवेशनामध्ये जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी विषय मांडून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा व आरक्षण द्यावे, यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे. अन्यथा प्रत्येकाच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील, तालुकाध्यक्ष अमोल कदम, चंद्रकांत कदम, जिल्हा संघटक ऋतुराज पवार, सुमित पाटील, अक्षय गायकवाड, रवी जाधव, सुशांत पवार, सागर निकम आंदोलनात सहभागी झाले.