गोवंश हत्याबंदी रद्दसाठी जिल्ह्यात निदर्शने

By Admin | Updated: May 20, 2015 00:09 IST2015-05-19T23:38:26+5:302015-05-20T00:09:58+5:30

गोवंश हत्याबंदीमुळे भाकड जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

Demonstrations in the district for cancellation of cow slaughter | गोवंश हत्याबंदी रद्दसाठी जिल्ह्यात निदर्शने

गोवंश हत्याबंदी रद्दसाठी जिल्ह्यात निदर्शने

सांगली : गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने मंगळवारी सांगलीसह जिल्ह्यात ठिकठिकाणी मंगळवारी निदर्शने करण्यात आली.सांगलीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या निदर्शनात नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सुरेश दुधगावकर, अरुण आठवले, बापू सोनवणे, अपर्णाताई वाघमारे, विशाल सकटे, संदेश भंडारे, रोहित शिवशरण, संजय शिंदे सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोवंश हत्याबंदीमुळे भाकड जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
मिरज : मिरजेत तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन दिले. भाकड जनावरे सांभाळण्याचा खर्च परवडणारा नाही. गोवंश हत्याबंदीमुळे चर्मकार व ढोर समाजाचा व्यवसाय अडचणीत आल्याने त्यांचे आर्थिक नुकसान सुरु आहे. गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा, अन्यथा भाकड जनावरे सांभाळण्याचा प्रतिमहा सहा हजार रुपये खर्च शासनाने शेतकऱ्यांना द्यावा, या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. माजी नगरसेवक अशोक कांबळे, नंदकुमार कांबळे, सुमनताई वाघमारे, रवींद्र कांबळे, योगेंद्र कांबळे, पोपट कांबळे, रसिक जकाते, प्रकाश इनामदार, राम कांबळे आंदोलनात सहभागी झाले होते.
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व तालुका अध्यक्ष पिंटू माने, महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, तालुका अध्यक्ष विशाल (लाला) वाघमारे, संजय वाघमारे, किरण बनसोडे, दत्ता आठवले यांनी केले.
यावेळी नानासाहेब वाघमारे म्हणाले, गोवंश हत्याबंदी कायदा हा अन्यायकारक आहे. या कायद्यामुळे कित्येक कुटुंबांची उपासमार होत आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा, अन्यथा देशातील शेतकरी कुटुंबातील जनावरे मंत्र्यांच्या दारात बांधण्यात येतील. परशुराम पाटील, पिंटू चंदनशिवे, महेश देसाई, रवी चंदनशिवे, सूरज वाघमारे, अमोल धेंडे, महेश माने, विशाल माने, रोहित कांबळे, सचिन वाघमारे व कार्यकर्ते उपस्थित होते.
कडेगाव : भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना अशक्य आहे. या भाकड जनावरांचे काय करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा, अशी मागणी करीत आरपीआय, कडेगाव तालुका संघटनेने कडेगाव तहसीलसमोर आंदोलन केले.
यावेळी आरपीआयचे कडेगाव तालुका अध्यक्ष महादेव होवाळ, उपाध्यक्ष जीवन करकटे, सरचिटणीस प्रवीण कांबळे, संकेत कांबळे, विजय गवाळे, बाळासाहेब दंडवते, प्रकाश दंडवते, भूषण दंडवते, धैर्यशील कांबळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)


सर्व पशू-प्राण्यांची हत्याबंदी करण्याची मागणी जत : जत तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांच्यातर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शासनाने गोहत्या बंदी कायदा केल्यामुळे जनावरांपासून कातडी कमावण्याचा व्यवसाय करणाऱ्यांवर अन्याय झाला आहे. शासनाने हत्याबंदी करायची असेल, तर सर्व पशू आणि प्राण्यांची हत्याबंदी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आंदोलनात ललिता कांबळे, उज्ज्वला पवार, अंबिका मांग, शैलजा चिकदुळे, अशोक हुवाळे, मुत्याप्पा कांबळे, राजेश वर्मा, तालुका सरचिटणीस सुनील कसबे, संजय कांबळे, श्रीकांत हुवाळे सहभागी झाले होते.

Web Title: Demonstrations in the district for cancellation of cow slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.