सांगलीत अंगणवाडी सेविकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:28 AM2021-09-25T04:28:34+5:302021-09-25T04:28:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कमी मानधनात व अडचणींचा सामना करत अंगणवाडी सेविका काम करत आहेत. तरीही त्यांच्या मागण्यांकडे ...

Demonstrations of Anganwadi workers in Sangli | सांगलीत अंगणवाडी सेविकांची निदर्शने

सांगलीत अंगणवाडी सेविकांची निदर्शने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कमी मानधनात व अडचणींचा सामना करत अंगणवाडी सेविका काम करत आहेत. तरीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अत्यंत तुटपुंज्या मानधनात अंगणवाडी सेविका काम करतात. याशिवाय कोविड कालावधीत त्यांनी सेवा दिली आहे. त्यामुळे त्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देण्यात यावा, कोरोना झाल्यास सर्व सेवा देण्यात याव्यात, आरोग्य क्षेत्रासाठी ६ टक्के निधीची तरतूद करावी, कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा लागू करावा कर्मचा-यांना १० हजार रूपये अतिरिक्त भत्ता देण्यात यावा, कोविडची बाधा झाल्यास कर्मचाऱ्यांना १० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, मिनी अंगणवाड्यांचे अंगणवाडीमध्ये रूपांतर करावे, अंगणवाडी कामासाठी दिलेला मोबाईल निष्कृष्ट दर्जाचा आहे. त्याऐवजी दर्जेदार टॅब द्यावेत यासह इतर मागण्या करण्यात अाल्या.

यावेळी आनंदी भोसले, नादीरा नदाफ, अरुणा झगडे, शुभांगी कांबळे, नीलप्रभा लोंढे, स्नेहलता कोरे यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Demonstrations of Anganwadi workers in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app