मिरजेत भाजपतर्फे योग दिनानिमित्त प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST2021-06-22T04:19:31+5:302021-06-22T04:19:31+5:30

मिरज : मिरजेत भाजपतर्फे योगा दिनानिमित्त रा. वि. भिडे मूकबधिर शाळेच्या मैदानावर योग प्रशिक्षण देण्यात आले. योग पुरस्कार ...

Demonstration on the occasion of Yoga Day by Miraj BJP | मिरजेत भाजपतर्फे योग दिनानिमित्त प्रात्यक्षिक

मिरजेत भाजपतर्फे योग दिनानिमित्त प्रात्यक्षिक

मिरज : मिरजेत भाजपतर्फे योगा दिनानिमित्त रा. वि. भिडे मूकबधिर शाळेच्या मैदानावर योग प्रशिक्षण देण्यात आले. योग पुरस्कार विजेत्या तेजस्विनी केसरखाने व श्रीकांत जयगोंड यांनी योग व साधना याबाबत मार्गदर्शन केले. प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक गणेश माळी, महादेव कुरणे, मोहन वाटवे, शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, ईश्वर जनवाडे, जयगोंड कोरे, पॉल करा, सचिन गाडवे, जयश्री कुरणे, वैशाली पाटील, रूपाली गाडवे, नयना कुरणे, प्राजक्ता कुरणे, सुषमा मंगावकर उपस्थित होते.

सध्याच्या कोरोना काळात नियमित योग, प्राणायाम, सूर्य नमस्कार, ध्यान रोगप्रतिकारकशक्ती, मानसिक संतुलनासाठी आवश्यक असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांनी सांगितले. शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर यांनी संयोजन केले.

Web Title: Demonstration on the occasion of Yoga Day by Miraj BJP