विशाल पाटील यांनी मतदारसंघ बदलूनही वसंतदादा कारखान्याच्या माध्यमातून परिसरात कायमस्वरूपी संपर्क साधला आहे. कोरोना काळात त्यांनी कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न केले. सॅनिटायझर उत्पादन करून घरोघरी वाटप केले. विविध प्रकारच्या उपक्रमात त्यांचे मोठे योगदान आहे. काँग्रेसच्या वाढीसाठी आणि पुन्हा बळकटीसाठी विशाल पाटील यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करावे, अशी मागणी मिरज पश्चिम भागातून करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद सदस्य विशाल चोगुले, जय हनुमान भाजीपाला संघाचे अध्यक्ष व वसंतदादा कारखान्याचे माजी संचालक सचिन डांगे, माजी उपसरपंच रमेश काशीद, मिरज तालुका काँगेस चिटणीस उद्योजक रमेश ताटे यांच्यासह विविध काँग्रेसप्रेमींनी विशाल पाटील यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करावे, अशी मागणी केली आहे.