विशाल पाटील यांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST2021-07-01T04:18:37+5:302021-07-01T04:18:37+5:30

विशाल पाटील यांनी मतदारसंघ बदलूनही वसंतदादा कारखान्याच्या माध्यमातून परिसरात कायमस्वरूपी संपर्क साधला आहे. कोरोना काळात त्यांनी कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न ...

Demand for Vishal Patil to be made Congress District President | विशाल पाटील यांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष करण्याची मागणी

विशाल पाटील यांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष करण्याची मागणी

विशाल पाटील यांनी मतदारसंघ बदलूनही वसंतदादा कारखान्याच्या माध्यमातून परिसरात कायमस्वरूपी संपर्क साधला आहे. कोरोना काळात त्यांनी कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न केले. सॅनिटायझर उत्पादन करून घरोघरी वाटप केले. विविध प्रकारच्या उपक्रमात त्यांचे मोठे योगदान आहे. काँग्रेसच्या वाढीसाठी आणि पुन्हा बळकटीसाठी विशाल पाटील यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करावे, अशी मागणी मिरज पश्चिम भागातून करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद सदस्य विशाल चोगुले, जय हनुमान भाजीपाला संघाचे अध्यक्ष व वसंतदादा कारखान्याचे माजी संचालक सचिन डांगे, माजी उपसरपंच रमेश काशीद, मिरज तालुका काँगेस चिटणीस उद्योजक रमेश ताटे यांच्यासह विविध काँग्रेसप्रेमींनी विशाल पाटील यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करावे, अशी मागणी केली आहे.

Web Title: Demand for Vishal Patil to be made Congress District President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.