मिरज पूर्व भागात ऊसतोडीला एकरी पाच हजारांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:12+5:302021-01-18T04:24:12+5:30
मिरज पूर्व भागातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट होत आहे. परिणामी शेतातील ऊस क्षेत्र पाण्याअभावी वाळू लागले आहे. ...

मिरज पूर्व भागात ऊसतोडीला एकरी पाच हजारांची मागणी
मिरज पूर्व भागातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट होत आहे. परिणामी शेतातील ऊस क्षेत्र पाण्याअभावी वाळू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांतून ऊस साखर कारखान्याला वेळेत पाठविण्यासाठी स्पर्धा लागली आहे. याचाच फायदा उठवीत ऊस तोडणी मजूर हात धुऊन घेत आहेत. यामध्ये कारखान्याचे स्लिप बाॅयही सामील असल्याची माहिती समोर येत आहे. कारखानदारांचा ऊसतोडणी मजुरांवर वचक नसल्याने एक एकर ऊस तोड करण्यासाठी पाच हजार रुपये ऊस उत्पादकाला मोजावे लागत आहेत. यामुळे ऊस उत्पादकांची चांगलीच कोंडी झाली आहे. याकडे कारखानदारांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून हाेत आहे.