कवठेमहांकाळला प्रांताधिकारी कार्यालय सुरू करण्याची मागणी;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST2021-08-26T04:29:50+5:302021-08-26T04:29:50+5:30

निवेदनात म्हटले आहे की, आजपर्यंत सतत कवठेमहांकाळ तालुक्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सध्या उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालयाची गरज कवठेमहांकाळ ...

Demand to start the prefecture office at Kavthemahankal; | कवठेमहांकाळला प्रांताधिकारी कार्यालय सुरू करण्याची मागणी;

कवठेमहांकाळला प्रांताधिकारी कार्यालय सुरू करण्याची मागणी;

निवेदनात म्हटले आहे की, आजपर्यंत सतत कवठेमहांकाळ तालुक्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सध्या उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालयाची गरज कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना लागणारे जातीचे प्रमाणपत्र, बिगरशेती, नाॅनक्रिमिलेअर दाखले, जमिनीबाबत दावे अशा विविध कारणांसाठी मिरज उपविभाग कार्यालयात जनतेला हेलपाटे घालावे लागतात. यामुळे मानसिक त्रास, आर्थिक अडचणी निर्माण होतात. तालुक्यातील जनतेच्या साेयीचा विचार करून कवठेमहांकाळ येथे उपविभागीय कार्यालय सुरू करावे.

यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी, रमजान मुल्ला, व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष धनाजी जाधव, प्रा. गौसमंहमद मुजावर, अफजल शिरोळकर, फैयाज मुल्ला, राम पवार उपस्थित हाेते.

Web Title: Demand to start the prefecture office at Kavthemahankal;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.