म्हैसाळ योजना सुरु करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:40+5:302021-01-08T05:28:40+5:30

पशुधनाचे लसीकरण ठप्पच सांगली : पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर पशुधनाला जिल्हा परिषद पशुसंवधन विभागाकडून लसीकरण केले जाते. पण, यावेळी कोरोनामुळे ...

Demand to start Mhasal scheme | म्हैसाळ योजना सुरु करण्याची मागणी

म्हैसाळ योजना सुरु करण्याची मागणी

पशुधनाचे लसीकरण ठप्पच

सांगली : पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर पशुधनाला जिल्हा परिषद पशुसंवधन विभागाकडून लसीकरण केले जाते. पण, यावेळी कोरोनामुळे अनेक तालुक्यातील पशुधनाचे लसीकरणच झाले नाही. जत तालुक्यातील काही ठिकाणी मेंढ्यांना तापाची साथ असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

शेतमजुरांचा तुटवडा

सांगली : सध्या रब्बी पिकांची मशागत आणि ऊस तोडणीनंतर शेत करण्यासाठी मिरज तालुक्यात शेतमजुरांची गरज आहे. मिरज पूर्व भागामध्ये द्राक्ष बागांमध्येही मजुरांची गरज आहे. पण, सध्या शेतमजुरांचा तुटवडा जाणवत आहे. यावर पर्याय म्हणून अनेकांनी नातेवाईकांना पाचारण केल्याचे दिसत आहे.

तळीराम दुचाकीस्वारांवर कारवाईची मागणी

सांगली : शहरातील काही बारमध्ये दारू पिऊन रात्री बेफाम वाहन चालविणारे दुचाकीस्वार सर्रास दिसून येतात. अशा दुचाकीस्वारांमुळे अनेकवेळा अपघातही घडले आहेत. त्यामुळे मद्यपी दुचाकीस्वारांवर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.

सांगली बसस्थानक परिसरात अतिक्रमणे

सांगली : येथील मुख्य बसस्थानक परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. परिसरातील टपरीधारक, रिक्षाचालकांच्या गर्दीतून वाट काढताना प्रवाशांची दमछाक होते. येथील अतिक्रमणे तातडीने हटवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

Web Title: Demand to start Mhasal scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.