कुंडलवाडीमार्गे बसेस सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:50 IST2021-02-21T04:50:20+5:302021-02-21T04:50:20+5:30
तांदुळवाडी : बसेस सुरू करण्याबाबत कुंडलवाडी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने शिराळा एसटी आगार तसेच सांगली विभाग नियंत्रकांना महिन्याभरापूर्वी पत्र दिले ...

कुंडलवाडीमार्गे बसेस सुरू करण्याची मागणी
तांदुळवाडी : बसेस सुरू करण्याबाबत कुंडलवाडी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने शिराळा एसटी आगार तसेच सांगली विभाग नियंत्रकांना महिन्याभरापूर्वी पत्र दिले आहे. अद्याप याबाबत कार्यवाही नसल्याने ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिसाद उमटत आहेत.
कुंडलवाडी (ता. वाळवा) हे शिराळा आगाराच्या कार्यक्षेत्रात येते. सरपंच रहिमशा फकिर यांनी लेखीपत्र शिराळा आगारप्रमुख व सांगली विभाग नियंत्रकांना यांना दि १५ जानेवारी २०२१ रोजी दिले. या पत्रामध्ये कुंडलवाडी (ता. वाळवा) मार्गे पूर्वी सुरू असणाऱ्या बसेस नियमितपणे सुरू करण्याची मागणी केली आहे. महाविद्यालये व शाळा सुरू झाल्या आहेत. नागरिकही प्रवासास बाहेर पडत आहेत. बसेस बंद असल्याने त्यांची गैरसाेय हाेते. मागणी करून महिना उलटला तरीही शिराळा आगाराची एकही बस सुरू झालेली नाही. यामुळे नागरिकांमधून संतप्त पडसाद उमटत आहेत.