जतला गुंठेवारी जमिनीबाबत निर्बंधाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:38+5:302021-06-20T04:18:38+5:30

जत : जत तालुक्यासह शहरातील मालमत्ता खरेदीधारकांची फसवणूक होऊ नये, यासाठी यल्लमादेवी यात्रेकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षित केलेल्या जमिनीसह नगर ...

Demand for restriction on Jatla Gunthewari land | जतला गुंठेवारी जमिनीबाबत निर्बंधाची मागणी

जतला गुंठेवारी जमिनीबाबत निर्बंधाची मागणी

जत : जत तालुक्यासह शहरातील मालमत्ता खरेदीधारकांची फसवणूक होऊ नये, यासाठी यल्लमादेवी यात्रेकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षित केलेल्या जमिनीसह नगर परिषद हद्दीतील गुंठेवारी जमीन व प्लाॅट खरेदी-विक्रीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे, जत नगर परिषद हद्दीतील अनेक बागायत शेतजमिनी तालुक्याच्या बाहेरील इस्टेट एजंटांनी खरेदी करुन या जमिनीवर गुंठेवारी पध्दतीने नियमबाह्य प्लाॅट पाडून विक्री सुरू केली आहे. याची चौकशी करून गुंठेवारी जमिनीचे चालू असलेले व्यवहार थांबविण्यात यावेत. गुंठेवारी जमिनीचे नियमाधिकरण (बिगरशेती) झाल्याशिवाय प्लाटींग खरेदी-विक्रीची व्यवहार सुरु आहेत. गुंठेवारी जमिनीचे नियमाधिकरण (बिगरशेती) करुन व्यवहार केले जावेत, दुय्यम निबंधक कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी केली.

प्रशासनाने या मागण्यांचा विचार करावा अन्यथा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.

Web Title: Demand for restriction on Jatla Gunthewari land