दीनानाथ नाट्यगृहाची दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:53+5:302021-02-06T04:47:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. सध्या नाट्यगृहाचा वापर भंगार ठेवण्यासाठी केला जात ...

दीनानाथ नाट्यगृहाची दुरुस्तीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. सध्या नाट्यगृहाचा वापर भंगार ठेवण्यासाठी केला जात आहे. या नाट्यगृहाची दुरुस्ती करून ते वाचवावे, असे साकडे भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने आयुक्तांना घालण्यात आले.
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिंदे म्हणाल्या की, दीनानाथ नाट्यगृहाची दयनीय अवस्था झाली आहे. २०१९ च्या नाट्यगृहाचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या त्याचा उपयोग महापालिकेने अतिक्रमित गाड्या ठेवण्यासाठी केला आहे. प्रेक्षकांना बसावयाच्या खुर्च्या मोडलेल्या आहेत. ग्रीन रूमचे पोपडे निघून पडत आहेत, पंखे चोरीला गेलेले आहेत, दरवाजे व कड्या कुलुपे मोडून काढण्यात आलेले आहेत, महापालिकेतील खराब झालेले टाईपरायटर, प्रिंटर तसेच नादुरुस्त सामान ठेवण्यासाठी नाट्यगृहाचा उपयोग होत आहे. जनरेटर रूम असूनदेखील जनरेटर नाही अशी बिकट अवस्था आहे. तरी आयुक्तांनी लक्ष घालून नाट्यगृहाची दुरुस्ती करण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सीएसआर फंडातून नाट्यगृह वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
या वेळी सांस्कृतिक आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता कुलकर्णी, नेहा दातार, नेहा शेटे, स्वप्नाली भट, सोनल शहा, गौरी शेलार, माधुरी पोतदार उपस्थित होत्या.
फोटो ओळी :- महापालिकेच्या दीनानाथ नाट्यगृहाची दुरुस्ती करावी, असे निवेदन भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने आयुक्त नितीन कापडणीस यांना देण्यात आले.