‘म्हैसाळ’चे पाणी सोडण्याची मिरज पूर्व भागात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST2021-01-20T04:26:27+5:302021-01-20T04:26:27+5:30

मिरज तालुक्यातील नरवाड, बेडग, आरग, एरंडोली, खटाव, मल्लेवाडी, जानराववाडी, लिंगनूर, बेळंकी आदी गावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी ...

Demand for release of water from Mhaisal in Miraj East | ‘म्हैसाळ’चे पाणी सोडण्याची मिरज पूर्व भागात मागणी

‘म्हैसाळ’चे पाणी सोडण्याची मिरज पूर्व भागात मागणी

मिरज तालुक्यातील नरवाड, बेडग, आरग, एरंडोली, खटाव, मल्लेवाडी, जानराववाडी, लिंगनूर, बेळंकी आदी गावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी शेतातील उभी पिके उन्हे धरू लागली आहेत. पिकांना पाण्याची गरज आहे. याशिवाय उशिरा द्राक्ष छाटणीच्या बागांनाही पाण्याची गरज आहे.

याची खातरजमा करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी सांगलीच्या उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्याकडे म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची लेखी मागणी केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संजय बेले, भरत चौगुले, बाळासाहेब लिंबीकाई, अजित हाळिंगळे, जोतिराम जाधव, संदीप बोरगावे, महेश जगताप आदी उपस्थित होते.

Web Title: Demand for release of water from Mhaisal in Miraj East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.