पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:21+5:302021-06-10T04:18:21+5:30
मशागतीची कामे अंतिम टप्प्यात सांगली : सोयाबीन, ज्वारी उत्पादक जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे असे असले तरी, काही भागांत ...

पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याची मागणी
मशागतीची कामे अंतिम टप्प्यात
सांगली : सोयाबीन, ज्वारी उत्पादक जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे असे असले तरी, काही भागांत कापूस, बाजरी, भात, कडधान्याही मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. खरीप हंगाम सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कोरोनाच्या दहशतीमध्ये मशागतीची कामे पूर्ण करुन पेरणीसाठी सज्ज झाला आहे.
वीजखांबामुळे अपघाताचा धोका
सांगली : जिल्ह्यात रस्त्यालगत असलेले वीज खांब गंजले आहेत. काही वीजखांब रस्त्याच्या मध्येच आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे परंतु याकडे ‘महावितरण’चे दुर्लक्ष झाले आहे.
कोरोना प्रतिबंधक साहित्याच्या मागणीत वाढ
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी सूज्ञ नागरिकांकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक साहित्याची मागणीही वाढली आहे. हे साहित्य विक्रीसाठी अनेकांनी जागोजागी दुकाने थाटले आहेत. नागरिकांकडून मास्क वापरण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याने मास्कची विक्री वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कर्ज हप्त्यांना स्थगिती देण्याची मागणी
सांगली : कोरोनाच्या कालावधीत अनेकांचे व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची तर अक्षरश: उपासमार होत आहे. अशा परिस्थितीत फायनान्स, बँक, बचत गटांच्या कर्जाचे हप्ते फेडायचे कसे? असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती द्यावी, अशी मागणी होत आहे.