एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:28 IST2021-08-15T04:28:03+5:302021-08-15T04:28:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार अद्याप मिळाला नाही. याबद्दल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे ...

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार अद्याप मिळाला नाही. याबद्दल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सरचिटणीस नारायण सूर्यवंशी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने एसटीच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार नियमित देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. तसेच जुलै महिन्याचा पगार सोमवारपर्यंत झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बांधकाम कामगारांची ग्रामपंचायतीत नोंदणी करा
सांगली : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचाय स्तरावर करण्याचे आदेश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी ग्रामीण व दुर्गम भागातील बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. नोंदणी नसल्यामुळे बांधकाम कामगारांना शासनाकडून दिलेल्या पैशाचा काहीच लाभ झालेला नाही.
मध्यपी वाहनधारकांवर कारवाईची गरज
सांगली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक मध्य प्राशन करून वाहने चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कारवाई हाेत नसल्याने युवा वाहनचालकांची हिंमत वाढत चालली आहे.
रोजगार हमी योजनेची कामे ठप्प
सांगली : जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांची मागील दोन वर्षांच्या तुलनेत संख्या घटली आहे. या भागातील मजूर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात कृष्णा, वारणा नदीकाठाकडे स्थलांतरित होतात. काही लोक रोजगारासाठी मोठ्या शहरात स्थलांतरित झाले होते. परंतु, गत वर्षापासून मजूर कोरोनामुळे आपल्या गावी परतले आहेत. या मजुरांसाठी रोजगार हमीच्या कामाचा मोठा आधार आहे; पण सध्या रोजगार हमीची कामेच बंद आहेत.