आटपाडीत बारा बलुतेदारांना पॅकेज देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:31+5:302021-04-27T04:28:31+5:30

लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे; परंतु न्हावी, सुतार, कुंभार, शिंपी, परीट आदी बलुतेदारांचे परंपरागत व्यवसाय पूर्णतः ...

Demand for package to twelve Balutedars in Atpadi | आटपाडीत बारा बलुतेदारांना पॅकेज देण्याची मागणी

आटपाडीत बारा बलुतेदारांना पॅकेज देण्याची मागणी

लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे; परंतु न्हावी, सुतार, कुंभार, शिंपी, परीट आदी बलुतेदारांचे परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहेत. या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने लॉकडाऊन जाहीर करताना ऑटो रिक्षाचालक, बांधकाम मजूर, फेरीवाले यांच्यासाठी आर्थिक साहाय्य जाहीर केले; परंतु बलुतेदारांसाठी कुठलेही आर्थिक साहाय्य नाही.

यामुळे बलुतेदारांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रति कुटुंब किमान पाच हजार रुपये आर्थिक साहाय्य करावे. तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, याकरिता कोविड केअर सेंटर तालुकास्तरावर सुरू करावेत. अशी मागणी करण्यात आली.

यावेळी प्रमोद धायगुडे, भाजपचे

तालुका अध्यक्ष उमाजी सरगर, प्रणव गुरव. जयवंत सरगर.

विष्णू अर्जुन, रामचंद्र चोपडे, वसंत अर्जुन, विलास जानकर. दत्ता पुकळे, प्रकाश शिंदे. अमोल सावंत.

प्रशांत शिंदे, रवींद्र ठोंबरे उपस्थित होते.

Web Title: Demand for package to twelve Balutedars in Atpadi