सांगली विभागाला नव्या बसगाड्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:13+5:302021-06-09T04:34:13+5:30
बांधकाम कामगारांच्या मजुरीत वाढ करा सांगली : कोरोनामुळे यावर्षी बांधकाम क्षेत्रात मंदी आहे. अनेकांनी घर बांधकाम करणे पुढे ढकलले ...

सांगली विभागाला नव्या बसगाड्यांची मागणी
बांधकाम कामगारांच्या मजुरीत वाढ करा
सांगली : कोरोनामुळे यावर्षी बांधकाम क्षेत्रात मंदी आहे. अनेकांनी घर बांधकाम करणे पुढे ढकलले आहे; मात्र ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, तेथे मजुरांना अत्यल्प मजुरी दिली जात असल्यामुळे मजुरी वाढवून देण्याची मागणी कामगारांनी केली आहे.
घरकुलांची बांधकामे वेळेत पूर्ण करा
सांगली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शेकडो नागरिकांना घरकुल मंजूर झाले आहेत. या लाभार्थ्यांना अनुदानही दिले आहे; पण काही लाभार्थ्यांनी घरांची कामे अपूर्ण ठेवली आहेत. यामुळे अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करावेत, अशा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत.
गटारीतील गाळ काढण्याची मागणी
सांगली : शहरात अनेक गटारींच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि गटारी खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही गटारीत पडून अपघात होण्याची शक्यता आहे. या गटारींवर कोणतेच अच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात. त्यामुळे दुरुस्ती करून गाळ काढण्याची मागणी केली जात आहे.
बचत गटांना शासनाने मदत करावी
सांगली : ग्रामीण भागातील पुरुष व महिला बचतगटाच्या माध्यमातून प्रगती साधत आहेत. त्यांच्याकरिता शासनाने स्वतंत्र विभाग निर्माण केला आहे. या माध्यमातून विकासाची दालने खुली झाली आहेत; परंतु कोरोनामुळे बचत गट दीड वर्षांपासून अडचणीत आहेत. या बचत गटांना शासनाने मदत करावी, अशी मागणी बचत गटातील महिलांकडून होत आहे.