सांगलीत नवीन बसस्थानकाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:56+5:302021-09-02T04:55:56+5:30

सांगलीतील सध्याचे बसस्थानक व आगार १९६५ मध्ये बांधण्यात आले आहे. वाढती प्रवासी संख्या व अपुरी जागा यामुळे या बसस्थानकाची ...

Demand for new bus stand in Sangli | सांगलीत नवीन बसस्थानकाची मागणी

सांगलीत नवीन बसस्थानकाची मागणी

सांगलीतील सध्याचे बसस्थानक व आगार १९६५ मध्ये बांधण्यात आले आहे. वाढती प्रवासी संख्या व अपुरी जागा यामुळे या बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे. दिवसाला सुमारे १२०० बसेसची येथून ये-जा सुरू असते; परंतु प्रवाशांची अपुऱ्या जागेमुळे मोठी गैरसोय होत आहे. महामंडळाने माधवनगरनजीक येथे काही वर्षांपूर्वीच १० एकर जागा घेऊन ठेवली आहे. त्या जागेला कुंपण भिंतही बांधली आहे. मात्र, जागा वापराविना पडून राहिल्याने, झुडुपे मोठ्या प्रमाणातात वाढली आहेत शिवाय जागेवर अतिक्रमणे होत आहेत.

तीन वर्षांपूर्वी तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासाठी ६ कोटी ४४ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरीही दिली आहे. मात्र, अद्याप काम सुरू करण्यासंदर्भात कोणतीच कार्यवाही झाली नाही. याठिकाणी सर्व सोयी-सुविधांयुक्त बसस्थानक उभारून सांगली जिल्ह्यातील जनतेला दिलासा द्यावा. निवेदन देताना शिवसेना बुधगाव शहरप्रमुख सतीश खांबे, मुंबईतील टाटा हाॅस्पिटलच्या कामगार सेनेचे प्रमुख तुकाराम गवळी उपस्थित होते.

Web Title: Demand for new bus stand in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.