Demand for minority language in Kannada schools | कन्नड शाळांना अल्पभाषिक दर्जाची मागणी

कन्नड शाळांना अल्पभाषिक दर्जाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : सांगली जिल्हा परिषद कन्नड माध्यमाच्या शाळांना अल्पभाषिक दर्जा देण्यात यावा व सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना आणि आदर्श कन्नड बळग महाराष्ट्र यांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यातील सर्व खासगी कन्नड माध्यमिक शाळांना अल्पभाषिक दर्जा मिळाला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सर्व कन्नड माध्यमाच्या शाळांना अल्पभाषिक दर्जा मिळावा. जिल्ह्यातील कन्नड माध्यमाच्या शाळेत मोठ्या प्रमाणात रिक्त असणारी पदे त्वरित भरावीत, कन्नड माध्यम शिक्षकांची आंतरजिल्हा बदली ऑनलाईन होत नाही, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी आर. के. पाटील, मलिकजान शेख, अमोल शिंदे, विरेश हिरेमठ, मीलन नागणे, गुरुबसू वाघोली उपस्थित होते.

Web Title: Demand for minority language in Kannada schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.