शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 15:15 IST

: मराठ्यांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने आता केंद्र सरकारनेच घटनेत दुरुस्ती करावी आणि आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी केली. भाजप सरकारने कायद्यात त्रुटी ठेवल्यानेच तो सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही असा आरोप त्यांनी केला.

ठळक मुद्देमराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची मराठा स्वराज्य संघाची मागणी भाजप सरकारनेच कायद्यात त्रुटी ठेवल्याचा साळुंखे यांचा आरोप

सांगली : मराठ्यांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने आता केंद्र सरकारनेच घटनेत दुरुस्ती करावी आणि आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी केली. भाजप सरकारने कायद्यात त्रुटी ठेवल्यानेच तो सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही असा आरोप त्यांनी केला.ते म्हणाले की, मराठा आरक्षणाविषयी केंद्र सरकारने टाळाटाळ केल्यास राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. मोदी सरकारने २०१८ मध्ये घटनेत दुरुस्ती केल्यानंतर कोणत्याही राज्य सरकारला आरक्षणाचा अधिकार उरलेला नाही. सर्व सूत्रे केंद्राच्या हाती गेली आहेत. या स्थितीत मराठ्यांना आरक्षण देण्याची जबाबदारी आता केंद्राकडे आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन भाजप सरकारने निवडणुका समोर ठेऊन आरक्षणाचा कायदा केला, पण तो परिपूर्ण नव्हता हे आता सिद्ध झाले आहे. आरक्षणासाठी नेमलेली मागासवर्गीय समितीदेखील बेकायदेशीर होती. एकूणच सारा प्रकार मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा होता.साळुंखे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकण्यासाठी केंद्राने आता कायदेशीर प्रक्रिया राबवावी. विधेयकाला लोकसभा व राज्यसभेत संमती मिळवून राष्ट्रपतींची स्वाक्षरी घ्यावी. कायदा सक्षम व्हावा यासाठी मागासवर्गीय आयोगाची संमतीही घ्यावी. ॲट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यात काही बदल सुचविले होते.

मागासवर्गीयांनी समाज त्याविरोधात रस्त्यावर उतरला, आंदोलने केली. तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेत कायदा करुन ॲट्रॉसिटीला संरक्षण दिले. तोच पॅटर्न आता मराठा आरक्षणासाठीही वापरावा. अन्यथा कोरोनानंतर संपूर्ण मराठा समाज पुन्हा रस्त्यावर येईल. हा उद्रेक निर्णायक असेल.साळुंखे म्हणाले की, भाजप सरकारने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही टिकणार नाही हे स्पष्ट होते. याला भाजपची निती कारणीभूत आहे. केंद्रात आणि राज्यातही भाजप सरकार असताना मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करण्यात आला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSatara areaसातारा परिसरCourtन्यायालयmaratha mahasanghमराठा महासंघ