तुजारपूरमध्ये मासिकसभा, ग्रामसभा नियमानुसार घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:35 IST2020-12-30T04:35:46+5:302020-12-30T04:35:46+5:30

इस्लामपूर : तुजारपूर (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच अस्मिता पाटील व ग्रामसेवक यांची मोगलाईच सुरू आहे. सभा नियमांचे नियम ...

Demand for holding monthly meeting, gram sabha in Tujarpur as per rules | तुजारपूरमध्ये मासिकसभा, ग्रामसभा नियमानुसार घेण्याची मागणी

तुजारपूरमध्ये मासिकसभा, ग्रामसभा नियमानुसार घेण्याची मागणी

इस्लामपूर : तुजारपूर (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच अस्मिता पाटील व ग्रामसेवक यांची मोगलाईच सुरू आहे. सभा नियमांचे नियम धाब्यावर बसवून मासिक सभा व ग्रामसभा चालविली जाते, ती नियमानुसार घेण्याची मागणी प्रवीण पाटील यांनी केली.

सभेचे विषय बदलणे, माघारी सह्या घेणे, प्रोसेडिंग सदस्यांना न दाखविणे या गोष्टींचा वृत्तात प्रवीण पाटील यांनी वाळवा पंचायतीचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्याजवळ मांडला. मासिक व ग्रामसभा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ प्रमाणेच होण्यासाठी सर्वपक्षीय निवेदन शशिकांत शिंदे यांना दिले. येथून पुढे तुजारपूरच्या सर्वच सभा नियमानुसार होतील, याची खात्री उपसभापती नेताजी पाटील यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे सतीश पाटील, कृष्णा दूध संघाचे संचालक मंगल बाबर, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत गुरव, सोपान पाटील, सुरेश बाबर, तानाजी बाबर उपस्थित होते.

Web Title: Demand for holding monthly meeting, gram sabha in Tujarpur as per rules