शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

बलात्काराची केस मागे घेण्यासाठी पाच लाखांच्या खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 11:47 IST

ताकारी (ता. वाळवा) येथील महिलेवर आठ महिन्यांपूर्वी झालेल्या बलात्कारासंदर्भातील केस मागे घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या  दलित महासंघाच्या नेत्यासह चौघांविरुध्द खंडणीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. सुनील शामराव लोखंडे (रा. ताकारी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देइस्लामपुरात गुन्हा दलित महासंघाच्या नेत्यासह चौघांविरुध्द तक्रारएका संशयिताची रेल्वेखाली आत्महत्या

इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा) येथील महिलेवर आठ महिन्यांपूर्वी झालेल्या बलात्कारासंदर्भातील केस मागे घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या  दलित महासंघाच्या नेत्यासह चौघांविरुध्द खंडणीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.

सुनील शामराव लोखंडे (रा. ताकारी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दलित महासंघाचा राज्य सरचिटणीस शंकर ज्ञानू महापुरे, रमेश दाविद थोरात, विजय दाविद थोरात यांच्यासह एका महिलेविरूध्द खंडणीचा गुन्हा नोंद केला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फेबु्रवारी महिन्यात एका महिलेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी शुभम लोखंडे, राहुल पारसे, सुमेर मगदूम अशा तिघांविरुध्द पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

बलात्काराच्या गुन्ह्यातून शुभम लोखंडे हा जामिनावर बाहेर आल्यानंतर संबंधित महिलेसह इतर संशयितांनी शुभम याला, बलात्काराची केस मिटवून घेतो, यासाठी ५ लाख रुपये दे, अशी मागणी करीत, ही रक्कम न दिल्यास दुसरी केस दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे सुनील लोखंडे यांनी पोलिसात धाव घेतली.

एका संशयिताची रेल्वेखाली आत्महत्यागुन्हा दाखल झाला त्याचदिवशी यातील सुमेर मगदूम याने भिलवडी परिसरात रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेनंतर संबंधित महिलेसह इतरांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा भिलवडी पोलिसांत नोंद आहे. या प्रकरणात शुभम लोखंडे हा साक्षीदार आहे.

टॅग्स :Policeपोलिसcrimeगुन्हे