मांगले पहिले वीज बिल थकबाकीमुक्त गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST2021-04-04T04:27:01+5:302021-04-04T04:27:01+5:30
मांगले : गेल्या वर्षभरातील वीज बिलाच्या थकबाकीमुळे अडचणीत आलेल्या महावितरणने मार्च महिन्यात राबविलेल्या थकबाकी वसुली मोहिमेत सात गावांचा समावेश ...

मांगले पहिले वीज बिल थकबाकीमुक्त गाव
मांगले : गेल्या वर्षभरातील वीज बिलाच्या थकबाकीमुळे अडचणीत आलेल्या महावितरणने मार्च महिन्यात राबविलेल्या थकबाकी वसुली मोहिमेत सात गावांचा समावेश असलेले मांगले शाखा कार्यालय सांगली जिल्ह्यातील पाहिले थकबाकीमुक्त कार्यालय ठरले आहे. त्यामुळे मांगले कार्यालय जिल्ह्यात आदर्श ठरले आहे.
वीज बिलाच्या थकबाकीमुळे अडचणीत आलेल्या महावितरण कंपनीला मार्च महिन्यात मांगले परिसरातील सात गावांतील थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. इस्लामपूर विभागातील मांगले शाखा कार्यालयाने कार्यक्षेत्रातील मांगलेसह, देववाडी, लादेवाडी, चिखलवाडी, फकीरवाडी, पवारवाडी, शिंगटेवाडी सात गावांतील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक १५८४ ग्राहकांनी ५६ लाख ७९ हजार रुपयांचे थकीत वीज बिल भरले आहे. त्यामुळे मांगले हे सांगली जिल्ह्यातील सात गावांचे पहिले थकबाकीमुक्त शाखा कार्यालय ठरले आहे.
इस्लामपूर विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कारंडे, उपविभागीय अभियंता प्रल्हाद बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता स्वप्नजा गोंदिल व त्यांच्या सहकाऱ्यांनी वसुलीसाठी विशेष परिश्रम घेतले.
मांगले पहिले थकबाकीमुक्त शाखा कार्यालय ठरले आहे.