कुपवाडमध्ये रस्त्यातील खड्डा मुजविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:26 IST2020-12-31T04:26:43+5:302020-12-31T04:26:43+5:30

कुपवाड : शहरातील विजयनगर रस्त्यावरील राणाप्रताप चौकामध्ये गेल्या १५ दिवसांपासून खोदलेला खड्डा त्वरित मुजविण्यात यावा. अन्यथा, त्याच खड्ड्यात उतरून ...

Demand for filling of potholes in Kupwad | कुपवाडमध्ये रस्त्यातील खड्डा मुजविण्याची मागणी

कुपवाडमध्ये रस्त्यातील खड्डा मुजविण्याची मागणी

कुपवाड : शहरातील विजयनगर रस्त्यावरील राणाप्रताप चौकामध्ये गेल्या १५ दिवसांपासून खोदलेला खड्डा त्वरित मुजविण्यात यावा. अन्यथा, त्याच खड्ड्यात उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवक राष्ट्रवादीच्यावतीने देण्यात आला आहे.

शहरातील राणाप्रताप चौकामध्ये गेल्या १५ दिवसांपूर्वी महापालिकेकडून पाईपलाईनसाठी मोठा खड्डा खोदला होता. ते काम पूर्ण झाले असून महापालिकेकडून खड्डा मात्र मुजविला नाही. त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण झाली आहे. छोटे-मोठे अपघात वारंवार घडत आहेत. येत्या दोन दिवसांत हा खड्डा महापालिकेने मुजवावा. अन्यथा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने खड्ड्यात उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष आशुतोष धोतरे, शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय खोत, संघर्ष समितीचे माजी अध्यक्ष अरुण रूपनर यांनी दिला आहे. त्यांनी याबाबत महापालिकेकडे तक्रारीचे लेखी निवेदन दिले आहे.

Web Title: Demand for filling of potholes in Kupwad