लॉकडाऊनमुळे पन्नास टक्के शालेय शुल्कमाफीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:39+5:302021-07-04T04:18:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊन काळातील शालेय शुल्कात पन्नास टक्के सवलतीची मागणी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली. ...

लॉकडाऊनमुळे पन्नास टक्के शालेय शुल्कमाफीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊन काळातील शालेय शुल्कात पन्नास टक्के सवलतीची मागणी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली. काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष जावेद शेख व संतोष पाटील यांनी पालकांच्या सह्यांचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमध्ये पालकांचे उत्पन्न पूर्ण थांबले आहे. या स्थितीत शाळांचे शुल्क भरणे आवाक्याबाहेरचे ठरले आहे. कुटुंबात एकापेक्षा अधिक मुले असणाऱ्या पालकांची तर पूर्ण आर्थिक कोंडी झाली आहे. अनेक पालकांनी मुलांना वर्षभराचा ब्रेक देणे पसंत केले आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील लाखो पालकांनी शुल्कमाफीसाठी सह्यांचे निवेदन दिले आहे. त्याचा विचार शासनाने केला पाहिजे.
मंत्री गायकवाड यांनी सांगितले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्वजीत कदम यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही विषय मांडला जाईल.
निवेदन देताना अंजुम शेख, प्रियांका पाटील, अनिता शिंदे, सूरज पाटील, किशोर बागल, अर्जुन पोवार उपस्थित होते.