वाईन शॉपप्रमाणे हाॅटेलची वेळ वाढवून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:23 IST2021-04-03T04:23:48+5:302021-04-03T04:23:48+5:30
शासनाच्या नवीन नियमानुसार, हॉटेल व्यवसाय रात्री ८ वाजता बंद करून पार्सल व्यवस्थेची परवानगी दिलेली आहे. शासनाने वाईन शॉप ...

वाईन शॉपप्रमाणे हाॅटेलची वेळ वाढवून देण्याची मागणी
शासनाच्या नवीन नियमानुसार, हॉटेल व्यवसाय रात्री ८ वाजता बंद करून पार्सल व्यवस्थेची परवानगी दिलेली आहे. शासनाने वाईन शॉप सुरू ठेवून हाॅटेलवर निर्बंध घातले आहेत. यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाल्याने आर्थिक नुकसान लक्षात घेऊन वाईन शॉपप्रमाणे हाॅटेलची वेळ वाढवून द्यावी. हॉटेल व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांचा पगार देणे, त्यांना सांभाळणे यामुळे शक्य होणार नाही. हॉटेल व्यवसायात केलेली गुंतवणूक व देखभाल, कामगारांचा पगार, वीजबिल, घरपट्टी, पाणीपट्टी, सर्व कर, शासकीय फी, बँकांचे कर्ज यांचा बोजा सर्व हॉटेल व्यावसायिकांवर आहे. सध्या होणाऱ्या कमाईतून सर्व खर्च करणे शक्य नसल्याने हॉटेल व्यवसाय आर्थिक अडचणीत येऊन बंद होण्याच्या स्थितीत आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट यांनाही व्यवसायाची वेळ वाढवून द्यावी. हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग व्यवसायातून शासनाला सर्वात जास्त महसूल मिळत असूनसुद्धा या व्यवसायावर मोठा अन्याय होत आहे. हाॅटेलचालकांना शासनाने व्यवसायाची वेळ वाढवून देण्याची मागणी हाॅटेल असोसिएशनचे अध्यक्ष नाझीर शेख उपाध्यक्ष नितीन चौगुले, ओमकार शुक्ल यांनी निवेदनात केली आहे.