कवठेमहांकाळमध्ये काेविड हॉस्पिटल उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:27 IST2021-04-27T04:27:47+5:302021-04-27T04:27:47+5:30

मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संभाजी भिसे यांच्याकडे देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात कोरोनाचे प्रमाण वाढतच ...

Demand for construction of Kavid Hospital in Kavathemahankal | कवठेमहांकाळमध्ये काेविड हॉस्पिटल उभारण्याची मागणी

कवठेमहांकाळमध्ये काेविड हॉस्पिटल उभारण्याची मागणी

मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संभाजी भिसे यांच्याकडे देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात कोरोनाचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे बेडची कमतरता भासत आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ शहरातील नगरपंचयतीच्या नाट्यगृहात कोविड हॉस्पिटल त्वरित सुरू करावे. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय हजारे, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अविराजे शिंदे, भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप पाटील, उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला, नगरपंचायतीचे गट नेते चंद्रशेखर सगरे, कवठेमहांकाळ विकास सोसायटीचे अध्यक्ष दिलीप झुरे, तालुका काँग्रेसचे खजिनदार व विश्वजित यूथ फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय शिंदे, वैभव गुरव, भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रणजित घाडगे, किसान सभेचे नेते दिगंबर कांबळे, बळीराजा पार्टीचे महासचिव बाळासाहेब रास्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनाजी जाधव, अमोलकुमार वाघमारे, संग्राम सोनवणे, सुशांत शिंदे, श्रीकांत फाकडे, मुबारक मुल्ला आदी उपस्थित होते.

Web Title: Demand for construction of Kavid Hospital in Kavathemahankal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.