आटपाडीतील तलावांच्या स्वच्छतेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:19 IST2020-12-27T04:19:32+5:302020-12-27T04:19:32+5:30

करगणी : आटपाडी तालुक्यातील सर्व लघु पाटबंधारे तलाव आणि राजेवाडीचा मोठा तलावावर आणि भोवताली मोठ्या प्रमाणात वाढलेली झुडपे काढावी. ...

Demand for cleanliness of Atpadi lakes | आटपाडीतील तलावांच्या स्वच्छतेची मागणी

आटपाडीतील तलावांच्या स्वच्छतेची मागणी

करगणी : आटपाडी तालुक्यातील सर्व लघु पाटबंधारे तलाव आणि राजेवाडीचा मोठा तलावावर आणि भोवताली मोठ्या प्रमाणात वाढलेली झुडपे काढावी. काही तलावाच्या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी संबंधितांना तातडीने सूचना द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा अनिता पाटील यांनी केली आहे. याबाबत जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांना निवेदन दिले आहे.

कृष्णा नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यातून दुष्काळी तालुक्यातील सर्व तलाव भरावे, अशी अनेक वर्षांची मागणी मंत्री जयंत पाटील यांनी सत्यात उतरविली. जिल्ह्यातील सर्व तलाव भरून दिल्याबद्दल दुष्काळी जनता आणि महिलांच्या वतीने जयंत पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना धन्यवाद देण्यात आले.

आटपाडी जवळच्या धांडोर मळ्यात स्वतंत्र स्मशानभूमी, रस्ते, पथदिवे आणि इतर विकासकामांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून खास तरतूद केली जावी, असेही निवेदन मंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या आटपाडी तालुका महिला उपाध्यक्ष आशा देशमुख, वैशाली सावंत, आदी उपस्थित होत्या.

Web Title: Demand for cleanliness of Atpadi lakes