वाटेगावात अण्णाभाऊंच्या नावे प्रवेशद्वार उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:18+5:302021-06-30T04:17:18+5:30
वाटेगाव : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी वाटेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्या नावाने महाप्रवेशद्वार तर कासेगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर ...

वाटेगावात अण्णाभाऊंच्या नावे प्रवेशद्वार उभारण्याची मागणी
वाटेगाव : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी वाटेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्या नावाने महाप्रवेशद्वार तर कासेगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मभूमी, वाटेगाव’ असा दिशादर्शक फलक लावण्याची मागणी मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव असलेल्या वाटेगाव येथे देशभरातून अण्णाभाऊंचे अनुयायी येत असतात. परंतु कासेगाव येथे राष्ट्रीय महामार्गावरून वाटेगावसाठी दिशादर्शक फलक नसल्याने त्यांची गैरसोय होते. तेथे दिशादर्शक फलक लावून वाटेगावमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचे महाप्रवेशद्वार उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली फकिरा साठे, सुरज साठे, शेखर साठे यांनी प्रशासनाला निवेदन दिले.