सांगली जिल्ह्यात नायलॉन मांजावर बंदीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:35+5:302021-01-13T05:10:35+5:30

मकर संक्रांत सणानिमित्त पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा या प्लास्टिक व कृत्रिमरितीने बनविलेल्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानव ...

Demand for ban on nylon cats in Sangli district | सांगली जिल्ह्यात नायलॉन मांजावर बंदीची मागणी

सांगली जिल्ह्यात नायलॉन मांजावर बंदीची मागणी

मकर संक्रांत सणानिमित्त पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा या प्लास्टिक व कृत्रिमरितीने बनविलेल्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानव जीवितास प्राणघातक इजा होतात. पतंगासह तुटलेला नायलॉन मांजा झाडावर, विद्युत तारांवर जमीनवर व नाल्यात आढळतो. नायलॉन मांजाचे लवकर विघटन होत नसल्याने पर्यावरणासाठी अधिकच घातक आहे. नायलॉन मांजामुळे गळा चिरल्याने गंभीर जखमी होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय हरित न्यायालयाने देशात नायलॉन मांजा बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार नायलॉन मांजाची विक्री, साठवणुकीस प्रतिबंध केला आहे. पतंगाचा मांजा विकणारे दुकानदार, पुरवठादार व वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. जळगाव, अहमदनगर येथे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर पोलीस, वनविभाग कारवाई करत आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यात याबाबत कारवाई होत नाही. सांगलीतील पीपल फॉर ॲनिमल्सचे अ‍ॅड. बसवराज होसगौडर यांनी सांगली जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्रीवर बंदी व विक्रेत्यांवर कारवाईची मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

Web Title: Demand for ban on nylon cats in Sangli district