गोरक्षकांच्या बंदोबस्ताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 23:46 IST2017-07-28T23:45:56+5:302017-07-28T23:46:58+5:30

सांगली : गोरक्षेच्या नावाखाली कथित गोरक्षकांकडून दलित, मुस्लिम समाजातील तरूणांवर जीवघेणे हल्ले केले जात आहेत.

Demand for the bailout | गोरक्षकांच्या बंदोबस्ताची मागणी

गोरक्षकांच्या बंदोबस्ताची मागणी

ठळक मुद्दे: दलित, मुस्लिमांवर हल्ले करणाºयांचा निषेध विविध सामाजिक संघटनांकडून मानवी साखळी केलीजमाव जमवून झुंडशाही प्रवृत्तीने गोरक्षेच्या नावाखाली निष्पाप तरूणांना मारले जात आहे

सांगली : गोरक्षेच्या नावाखाली कथित गोरक्षकांकडून दलित, मुस्लिम समाजातील तरूणांवर जीवघेणे हल्ले केले जात आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आणि कथित गोरक्षकांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून सांगलीतील स्टेशन चौकात शुक्रवारी मानवी साखळी केली. तसेच दिवसभर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाºयांकडे मागण्यांचे निवेदन दिले.
या आंदोलनात जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील, अ‍ॅड्. के. डी. शिंदे, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. नामदेवराव करगणे, सुधार समितीचे अ‍ॅड्. अमित शिंदे, भानुदास पाटील, भष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे विनोद मोरे, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रवीण कोकरे, माजी सैनिक संघटनेचे हिम्मतराव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव ओऊळकर, ज्योती अदाटे, सुनीता मदने, मुस्लिम आरक्षण समितीचे मुनीर मुल्ला, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जैलाब शेख, आम आदमी पार्टीचे साजिद मुजावर, कडेगाव नगरपंचायत समितीचे उपनगराध्यक्ष साजिद पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलकांकडून सरकार आणि जातीयवादी शक्तीच्याविरोधात जोरात घोषणाबाजी केली जात होती. आंदोलकांनी जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये, जमाव जमवून झुंडशाही प्रवृत्तीने गोरक्षेच्या नावाखाली निष्पाप तरूणांना मारले जात आहे, त्यामुळे गोरक्षकांच्या बंदोबस्ताची मागणी आंदोलकांनी केली.

लोकशाहीला लागलेला सामाजिक कलंक
गोरक्षेच्या नावाखाली व्यापाºयांना गोरक्षक मारत आहेत. काही मुस्लिम, दलित तरूणांवर जीवघेणा हल्ला केला जात आहे. हा भारताच्या लोकशाहीला लागलेला सामाजिक कलंक असल्याची टीका प्रा. शरद पाटील यांनी केली. तसेच राज्य शासनाने सामाजिक एकता टिकण्यासाठी जातीच्या आधारावर होणारे हल्ले थांबविण्याची गरज आहे. अन्यथा सर्व सामाजिक संघटनांना संघटित करून तीव्र आंदोलनाचा लढा उभारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

गोरक्षकांकडून दलित, मुस्लिम समाजातील तरूणांवर जीवघेणे हल्ले केले जात आहेत. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून सांगलीतील स्टेशन चौकात शुक्रवारी मानवी साखळी केली. यामध्ये प्रा. डॉ. बाबूराव गुरव, माजी आ. प्रा. शरद पाटील, अ‍ॅड्. के. डी. शिंदे आदी सहभागी होते.

Web Title: Demand for the bailout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.