ऐतवडे बुद्रुक येथे पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव जलवाहिनीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST2021-09-15T04:30:56+5:302021-09-15T04:30:56+5:30
गावासाठी २००५ मध्ये भारत निर्माण योजना व २०१८ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना करण्यात आल्या. मात्र या ...

ऐतवडे बुद्रुक येथे पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव जलवाहिनीची मागणी
गावासाठी २००५ मध्ये भारत निर्माण योजना व २०१८ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना करण्यात आल्या. मात्र या योजनांमध्ये गावाबाहेरील वाढीव वस्तीचा समावेश नसल्यामुळे याठिकाणी जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वाढीव वाडी-वस्त्यांचा पाणी याेजनेत समावेश करून जलवाहिनीसाठी मंजुरी मिळावी व त्या वस्त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. कुंभार टेक, शेखरवाडी फाटा, कावखडी फाटा, पेट्रोल पंप परिसर या भागात अनेक कुटुंब राहात आहेत. या ठिकाणी जलजीवन मिशनअंतर्गत वाढीव जलवाहिनी तातडीने मंजूर करून येथील लोकांचा पाणी प्रश्न तातडीने साेडविण्याची गरज आहे. वाढीव जलवाहिनीच्या मंजुरीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनाही निवेदन दिले असल्याचे सौरभ पाटील यांनी सांगितले.