लाडेगाव शाळेत शिक्षक नेमण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:22 IST2021-02-08T04:22:51+5:302021-02-08T04:22:51+5:30
वशी : लाडेगाव (ता. वाळवा) येथील शाळेत एकच शिक्षक असल्याने येथील व्यवस्थेवर ताण येत आहे. याचा विचार करून येथे ...

लाडेगाव शाळेत शिक्षक नेमण्याची मागणी
वशी : लाडेगाव (ता. वाळवा) येथील शाळेत एकच शिक्षक असल्याने येथील व्यवस्थेवर ताण येत आहे. याचा विचार करून येथे आवश्यक शिक्षक नेमावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत सरपंच रणधीर पाटील यांनी शिक्षक आमदार जयंत आसगावकर इस्लामपूर दाैऱ्यावेळी निवेदन दिले.
लाडेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये १ ते ७ वीपर्यंत वर्ग असून, केवळ एकच शिक्षक आहे. त्यामुळे ७ वीपर्यंत वर्ग व एक शिक्षक अशी शाळेची अवस्था आहे. वेळवर शिक्षक न मिळाल्यास त्या सर्व शाळा बंद पडणार असून, सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित होतील. यामुळे शाळेत शिक्षक नेमावेत व शाळेला कम्पाउंड उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
फोटो - ०४०२२०२०-आयएसएलएम - वशी निवेदन न्यूज
लाडेगाव, ता. वाळवा येथील शाळेत शिक्षक नेमावेत व शाळा कम्पाउंडसाठी निधी मंजूर करण्याबाबत सरपंच रणधीर पाटील यांनी आमदार जयंत आसगावकर यांना निवेदन दिले.