कडेगाव तहसीलदारांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:07 IST2021-01-13T05:07:29+5:302021-01-13T05:07:29+5:30
रामापूर येथील संतोष आनंदा माने यांनी तलाठी डी.बी. कुंभार, कडेगावच्या तहसीलदार डॉ. पाटील यांच्यासह रामापूरचे सरपंच पती व उपसरपंच ...

कडेगाव तहसीलदारांवर कारवाईची मागणी
रामापूर येथील संतोष आनंदा माने यांनी तलाठी डी.बी. कुंभार, कडेगावच्या तहसीलदार डॉ. पाटील यांच्यासह रामापूरचे सरपंच पती व उपसरपंच यांनी खोट्या कागदपत्रांनी मानसिक त्रास दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार दिली होती. परंतु, चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गोसावी यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करता संबंधितांना पाठीशी घातल्याचा आरोप या वेळी आंदोलकांनी केला.
रिपाइंचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेश तिरमारे, जिल्हा सरचिटणीस सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी १२.३० वाजता पोलीस उपअधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. त्या वेळी कडेगावच्या तहसीलदार डॉ. पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी आंदोलक आक्रमक झाले.
विटा पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा अडविला. त्या वेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्यानंतर प्रांताधिकारी संतोष भोर, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. त्या वेळी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन या वेळी अधिकाऱ्यांनी दिले.
या मोर्चात रिपाइंचे दादासाहेब चंदनशिवे, सुधीर कांबळे, स्नेहलकुमार कांबळे, दिनकर धेंडे, जितेंद्र सोरटे, अक्षय मोहिते, संतोष माने, सुदाम काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - ११०१२०२१-विटा-आरपीआय मोर्चा
ओळ : कडेगावच्या तहसीलदार व चिंचणीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा यासाठी सोमवारी रिपाइंच्या वतीने विटा पोलीस उपअधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.