बलात्कारप्रकरणी आरोपीच्या साथीदारांविरुद्ध कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST2021-02-05T07:23:54+5:302021-02-05T07:23:54+5:30
मिरजेत एका अल्पवयीन मुलीवर नदाफ गल्लीतील फरहान ढालाईत नावाच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली. संबंधित मुलीला धमकावून, शिवाजी ...

बलात्कारप्रकरणी आरोपीच्या साथीदारांविरुद्ध कारवाईची मागणी
मिरजेत एका अल्पवयीन मुलीवर नदाफ गल्लीतील फरहान ढालाईत नावाच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली. संबंधित मुलीला धमकावून, शिवाजी रस्त्यावर एका खोलीत नेऊन तिला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यास अटक झाली आहे. या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीस मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारांवर कारवाई झालेली नाही. याबाबत चौकशी करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून शक्ती कायद्यांतर्गत आरोपींना कठोर शिक्षा द्यावी. जिल्ह्यात बलात्काराचे प्रकार वारंवार सुरू आहेत. याची दखल घेऊन जिल्ह्यात मुलीच्या शाळा व महाविद्यालय परिसरात निर्भया पथकाची गस्त सुरू करावी, अशीही मागणी भाजप महिला कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्याकडे केली. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या ज्योती जयपाल कांबळे, माधुरी वसगडेकर, संगीता जाधव, गीता पवार, वैशाली शेळके उपस्थित होत्या.