ओबीसी घटकांना पदोन्नतीत १७ टक्के आरक्षणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST2021-06-16T04:36:05+5:302021-06-16T04:36:05+5:30
सांगली : राज्यातील ओबीसी घटकांना पदोन्नतीमध्ये १७ टक्के आरक्षणाची मागणी ओबीसी संघटनेने केली. सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले ...

ओबीसी घटकांना पदोन्नतीत १७ टक्के आरक्षणाची मागणी
सांगली : राज्यातील ओबीसी घटकांना पदोन्नतीमध्ये १७ टक्के आरक्षणाची मागणी ओबीसी संघटनेने केली. सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील नाभिक, माळी, कुंभार, सुतार, जंगम, शिंपी, परीट, धोबी, सोनार, गुरव, पुजारी, तेली, कुणबी यांसह राहिलेल्या ओबीसी घटकांसाठी पदोन्नतीमध्ये १७ टक्के आरक्षणाची तरतूद त्वरित करावी, राज्यभरातील ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांत २७ टक्के आरक्षण ठेवावे. तालुकास्तरावर मंगल कार्यालय कम ओबीसी भवन उभे करावे. प्रत्येक ओबीसी कारागिराला बिनव्याजी १० लाख रुपये कर्जाची योजना सुरू करावी.
निवेदन देण्यासाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मधुकर जंगम, जिल्हाध्यक्ष सुहास पंडित, दीपक परदेशी, लक्ष्मण महापुरे, संतोष जंगम, राजू दीक्षित, आदी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना निवेदन दिले.