शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे उदात्तीकरण हटवा, संभाजी बिग्रेडची कुलगुरुंकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 13:30 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांचे गुरू-शिष्य संबंध जोडून मनुस्मृतीच्या उदात्तीकरण केले आहे

संख : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांचे गुरू-शिष्य संबंध जोडून मनुस्मृतीच्या उदात्तीकरण केले आहे. हे अभ्यासक्रमातून तत्काळ हटवावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयस नाईक यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू यांना दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्राच्या १२ जुलै २०२२ च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्र. २ (अ) मध्ये शिवाजी महाराजांच्या राजनीतिला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा तसेच प्रश्न क्र. ३ (ई) मध्ये मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा. हे प्रश्न विचारण्यात आले आहेत.मुक्त विद्यापीठात भारतीय संविधान विरोधी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची भेटच झाली नसल्याचे अनेक इतिहास संशोधकांनी व दि.१६ जुलै २०१८ रोजीच्या औरंगाबाद खंडपीठाने निकालात नमूद केले आहे. असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी लिहिलेल्या खोट्या इतिहासाला अभ्यासक्रमात स्थान दिले आहे. हा खोटा इतिहास लिहिणारी अभ्यासक्रम समिती रद्द करावी. प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नांबाबत यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाने जाहीर माफी मागावी. अभ्यासक्रमातील हा प्रश्न व चुकीचा इतिहास न हटवल्यास ब्रिगेडच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीYashwantrao Chavan Maharashtra Open Universityयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ