शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ताकारीच्या चौथ्या आवर्तनास विलंब, कालवा अस्तरीकरणाचे काम बंद ठेवण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:41 IST

ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजना सुरू ठेवण्याकरिता कृष्णा नदीत आवश्यक ती पाणी पातळी मिळण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग वाढविणे गरजेचे आहे. ३० एप्रिलरोजी तिसरे आवर्तन संपले आणि ताकारी योजना बंद झाली. आता मे महिन्यातील चौथे आवर्तन तातडीने मिळणे गरजेचे आहे. ऐन उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे व शेतीपिके करपून चालली आहेत.

ठळक मुद्देताकारीच्या चौथ्या आवर्तनास विलंबकालवा अस्तरीकरणाचे काम बंद ठेवण्याची तयारी

प्रताप महाडिक कडेगाव : ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजना सुरू ठेवण्याकरिता कृष्णा नदीत आवश्यक ती पाणी पातळी मिळण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग वाढविणे गरजेचे आहे. ३० एप्रिलरोजी तिसरे आवर्तन संपले आणि ताकारी योजना बंद झाली. आता मे महिन्यातील चौथे आवर्तन तातडीने मिळणे गरजेचे आहे. ऐन उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे व शेतीपिके करपून चालली आहेत.जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणात दुष्काळ पडला असून याची गंभीर दखल घेऊन शासनाने सिंचन योजना चालू ठेवण्याची गरज आहे. वीज बिलांच्या शुल्कामध्ये टंचाईचा कोट्यवधी रुपयांचा खर्च बचत होण्यास मदत होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाणीपट्टी विहित वेळेत वसूल होते. त्यामुळे योजना सक्षमपणे व अविरतपणे कार्यरत राहिली. वीजबिलाच्या ८१-१९ फॉर्म्युल्यामुळे तर ही योजना अधिक सक्षम झाली. सध्या ताकारी योजनेची ९ कोटी ५० लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे. परंतु साखर कारखान्यांकडून ७ कोटी रुपयांची वसूल झालेली पाणीपट्टी येणेबाकी आहे.

राज्य शासनाकडून टंचाई काळात दिलेल्या आवर्तनाची मागील आणि चालू वर्षाची ५ कोटी ८८ लाख इतकी येणेबाकी आहे. याशिवाय चालूवर्षी दिलेल्या आवर्तनाची ८१ टक्के याप्रमाणे २ कोटी इतकी वीजबिलाची रक्कम येणेबाकी आहे. यामुळे योजना सक्षम असताना, आवर्तन बंद का, असा सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होण्यास होणाऱ्या विलंबाचे खापर कालवा अस्तरीकरणाच्या सुरू असलेल्या कामावर फोडले जात आहे. परंतु आवर्तन कालावधित अस्तरीकरणाचे काम बंद ठेवण्याची तयारी संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी केली आहे.

टॅग्स :DamधरणSangliसांगली