शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत शाखा अभियंता जाळ्यात, लाचलुचपतची कारवाई : मोजणीदाराकडून दहा हजारांची घेतली लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 16:04 IST

म्हैसाळ (ता. मिरज) येथील पाटबंधारेच्या २०१६-१७ च्या आकारणी पत्रकावर सही करण्यासाठी पाटबंधारे कार्यालयातील मोजणीदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारणाºया प्रमोद दुर्गादास अकोलकर (वय ५५, रा. लक्ष्मी अनंत अपार्टमेंट, मंगलमूर्ती कॉलनी, माळी चित्रमंदिरजवळ, सांगली) या शाखा अभियंत्यास रंगेहात पकडण्यात आले. मिरज पाटबंधारे कार्यालयात सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देमोजणीदाराकडून दहा हजारांची लाचपाटबंधारे कार्यालयात शुकशुकाट

सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील पाटबंधारेच्या २०१६-१७ च्या आकारणी पत्रकावर सही करण्यासाठी पाटबंधारे कार्यालयातील मोजणीदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या प्रमोद दुर्गादास अकोलकर (वय ५५, रा. लक्ष्मी अनंत अपार्टमेंट, मंगलमूर्ती कॉलनी, माळी चित्रमंदिरजवळ, सांगली) या शाखा अभियंत्यास रंगेहात पकडण्यात आले. मिरज पाटबंधारे कार्यालयात सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.तक्रारदार हे सांगलीत पाटबंधारे विभागात मोजणीदार आहेत. त्यांनी पाटबंधारे शाखेच्या म्हैसाळ येथील २०१६-१७ चे आकारणी पत्रक तयार करुन ते सही घेण्यासाठी शाखा अभियंता अकोलकर याच्याकडे सादर केले होते. अकोलकर याने सही घेण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पैसे दिले तरच सही करणार, असे त्याने सांगितले होते.

चर्चेअंती अकोलकरने दहा हजार रुपये तरी द्यावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे मोजणीदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. या विभागाने तक्रारीची चौकशी केली. यामध्ये अकोलकरने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.अकोलकरने लाचेची रक्कम सोमवारी घेऊन येण्यास सांगितले होते.

तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिरजेतील पाटबंधारे कार्यालयात सापळा लावला. दुपारी सव्वाचार वाजता मोजणीदाराकडून लाच घेताना अकोलकरला रंगेहात पकडण्यात आले. त्याची पाटबंधारे शाखेच्या म्हैसाळ कार्यालयात नियुक्ती आहे.

पण मिरजेतील शाखेचा त्याच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे.पाटबंधारे कार्यालयात शुकशुकाट

अकोलकरला लाच घेताना पकडण्यासाठी यापूर्वीच सापळा लावला होता. पण त्यावेळी त्याला कारवाईची चाहूल लागल्याने त्यानंतर बघूया, असे सांगून त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. पण सोमवारी तो अखेर जाळ्यात सापडला. या कारवाईनंतर पाटबंधारे कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. 

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हा